टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं. 2016मध्ये मीराबाई यांच्यासोबत असंच झालं होतं. ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशा दुसऱ्या खेळाडू होत्या ज्यांच्या नावासमोर डिड नॉट फिनिश असं लिहिलेलं होतं.जे वजन मीरा सराव करताना सहजपणे उचलत असत, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू त्यांचे हात जखडले होते.

 

 

 त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे खूप कमी भारतीयांनी बघितलं. सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरल्या. 2016मध्ये तर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि दर आठवड्याला त्यांना मानसिक तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले.या अपयशानंतर खेळाला रामराम ठोकावा असं एकदा मीराबाई यांच्या मनात आलं. पण त्यांनी माघार न घेता गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली.