माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची थोडक्यात कार्य व प्रवास ।। Atal Bihari Vajpayee's brief work and travel

एकेकाळी ज्यांच्या कवितांनी लोक मंत्रमुग्ध व्हायचे त्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दिर्घ आजाराने आज वयाच्या ९३ व्या वर्षी  निधन झाले. २५  डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेरमध्ये एका शिक्षकाच्या घरात अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला.  ग्वॉल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये वाजपेयी यांचे शिक्षण  झाले.  आज ते कॉलेज लक्ष्मीबाई कॉलेज म्हणून ओळखले जाते. राज्यशास्त्रात एम ए झालेले वाजपेयी आयुष्यभर अविवाहित राहिले. राजकारणात येण्यापुर्वी वाजपेयींनी मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पांचजन्य व स्वदेश आणि वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणूनही काम पाहिले.

१९५१  ला स्थापन झालेल्या भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य अशी वाजपेयी यांची ओळख . वाजपेयींच्या राजकारणातला सुरवातीचा काळ हा फार खडतर होता. लोकसभेची पहीली पोट निवडणुक वाजपेयी लखनऊ मधून लढले व पहील्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर भारतीय जनसंघाने  १९५७ मध्ये वाजपेयींना लखनौ, मथुरा आणि बलरामपूर अशा तीन मतदारसंघांमधून मैदानात उतरवले. लखनौतून वाजपेयींचा पराभव झाला तर मथुरा मतदारसंघात त्यांची जमानत रक्कमच जप्त झाली. पण बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होत वाजपेयी पहिल्यांदा संसदेत पोहोचले ही वाजपेयींच्या चार दशकांपेक्षा जास्त काळाच्या संसदीय कारकिर्दीची ही सुरुवात होती.

१९६८ ते १९७३ या काळात वाजपेयी भारतीय जन संघाचे अध्यक्ष होते. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणिबाणी विरोधात वाजपेयी खंबिरपणे उभे राहिले. आणिबाणीच्या काळात तर वाजपेयींना तुरुंगवासही भोगवा लागला पण तरीही त्यांनी पक्ष कार्यात खंड पडू न देता पुढे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणून १९७७ ते १९८० या काळात वाजपेयींनी पक्षबांधणीचे काम केले.१९८० ते १९८६ या अवघड काळात वाजपेयींनी भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. अकराव्या लोकसभेत वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते मात्र  विरोधी पक्षात असतांना देखील वाजपेयी सतत सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर धारेवर धरत. दुस-या लोकसभेपासून तेराव्या लोकसभेपर्यंत वाजपेयी खासदार होते. मात्र त्यानंतर  १९८४  मध्ये ग्वॉल्हेर मतदारसंघात वाजपेयींचा माधवराव शिंदेंनी पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा वाजपेयी संसदेत परतले आणि पंतप्रधानही झाले.

माहिती - HW मराठी

Comments