कदाचित निल आर्मस्ट्रॉग च्या अगोदर चंद्रावर कोणी दुसरा व्यक्ती गेला असावा

नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले.  त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्राँग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते
`ये चांद सा रोशन चेहरा' असं 70 च्या दशकात टीजिंग करणाऱया नायकाला 2000 साली `मुझे भुलेसे भी चांद तुम ना कहो, चांद में तो कई दाग है' असं नायिका ऐकवायला लागली. कारण ज्या चंद्राची उपमा तिला दिली जातेय त्या चंद्रावर डागच नाहीत तर कृष्णविवरे सुध्दा आहेत हे तिला कळलं होतं. त्यामुळे मजनू बनून उसासे टाकणाऱया समस्त वासुंची मोठी पंचाईत झाली एवढं नक्की. आणि हे घडवून आणणारे ही दोन पुरुषच, त्यामुळे तर बोलतीच बंद. पण असं असलं तरी त्या हजारो मैल दूर असलेल्या चांदोबाला भेटून आलेल्या नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन विषयी कमालीची क्युरियॉसिटी नसेल असा एकही मनुष्यपाणी या पृथ्वीतलावर उरला नाही, हेही तितकंच खरं.
नील आर्मस्ट्राँग आणि एडविन (बझ)ऑल्ड्रिन हे दोघेही अडीच तास चांदोबाच्या पृष्ठभागावर होते. या दरम्यान 2 मिनिटांसाठी नासाशी त्यांचा संपर्क तुटला होता. या दोन मिनिटात त्यांनी एक विचित्र गोष्ट पाहिली. या दोन मिनिटांत कोणीतरी तिसरंच त्यांना न्याहाळत आहे असं नीलना वाटलं. 1988 साली प्रकाशित झालेल्या टिमोथी गूड यांच्या `अबोव टॉप सिकेटस्' या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे. अपोलो 11 मधून येणारे आवाजाचे सिग्नल्स नासाच्या ह्युस्टन हेडक्वार्टर वरील हॅम रेडियोवर येत होते. त्यात या दोन मिनिटांचं ध्वनीमुद्रण झालं आहे. यात या दोघांचे, `अरे बापरे, केवढे अवाढव्य ! मला खात्री आहे की इथे चंद्राच्या दुसऱया बाजूला आणखी कोणाचे तरी स्पेसक्राफ्ट आलं आहे!' असे संवाद रेकॉर्ड झाले आहेत (`अबोव टॉप सिकेटस्' पान 384). पण हा प्रसंग आणि संवाद नासाने जनतेपासून लपवून ठेवला. मॉरिस चॅटेलेन या नासाच्या कम्युनिकेशन इंजिनिअरने निवृत्तीपश्चात `अवर कॉस्मिक ऍनसेस्टर' या 1975 साली प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात नासाच्या अपोलो चांद्र मोहिमेतील कम्युनिकेशन पद्धतीचे सविस्तर वर्णन केले आहे.
अपोलो 11 मिशनच्या आधी झालेल्या 10 सफरी आणि जेमिनी या सफरींच्या दरम्यानही उडत्या तबकड्या दिसल्या होत्या. याची कल्पना त्या त्या वेळच्या अंतराळवीरांनी मिशन कंट्रोलला दिली होती.  पण 1969 सालच्या अपोलो 11 चे हे वृत्त 1975 पर्यंत नासाने लपवून ठेवले कारण या मोहिमेत नासाचे नील आणि ऑल्ड्रिन यांना चंद्रावर पाऊल ठेवणे शक्य झाले होते. यामुळेच त्या सर्व तबकड्यांचं विश्लेषण नासाने कधीच दिलं नाही. नासाच्या अंतराळवीरांनी स्वतला कधीच हिरो म्हटलं नाही. कारण एका मोहिमेमागे किती लोकांचे कष्ट असतात याची त्यांना कल्पना होती. नासाने मात्र त्यांच्या सर्वच निरिक्षणांचा बारकाईने अभ्यास केला असं म्हणता येणार नाही. नील यांच्या मनातही कदाचित याचं दुःख असेल. म्हणूनच त्यांनी नासातून निवृत्त होऊन सिनसिनाटी मध्ये प्राध्यापकी केली. प्रसिद्धीपासून दूर राहिले. अगदी अपोलो 11 च्या यशाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते.

Comments