*!! भुयार !!*
जमिनीखालून काढलेल्या मार्गाला भुयार किंवा बोगदा म्हणतात. भुयार बहुतेकवेळा संपूर्ण बंदिस्त असते व त्याच्या सुरुवातीस व शेवटास खुला मार्ग असतो. भुयाराचा वापर पादचारी, वाहन, कालव्याचे पाणी किंवा रेल्वे यांच्या येण्याजाण्यासाठी केला जातो. भुयार बहुतेक वेळा लांब व अरुंद असते.
*सर्वात लांब भुयारे*
▪२०१७ साली वापरात आल्यानंतर स्वित्झर्लंडमधील ५७ किमी गॉटहार्ड बेस रेल्वे बोगदा हा जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा असेल.
▪५३.९ किमी लांबीचा जपानमधील सैकान बोगदा हा सध्या जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे.
▪इंग्लिश खाडीच्या खालून जाणारा चॅनल टनेल हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब रेल्वे बोगदा आहे.
▪११.२१५ किमी लांबीचा पीर पंजाल रेल्वे बोगदा हा भारतामधील सर्वात लांब बोगदा असेल.
*गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा*
गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतांतील बोगदा आहे. याच्या दोन टोकांतील अंतर ५७ किमी (३५ मैल) असून आतील बोगदे, जोडबोगदे व इतर रस्त्यांची एकूण लांबी १५२ किमी आहे. हा जगातील सगळ्यात लांबीचा बोगदा आहे. यानंतरचा सगळ्यात मोठा बोगदा जपानचा सैकान बोगदा आहे.
चौदा वर्षे बांधकाम चाललेला हा बोगदा बांधण्यास १२ अब्ज २० कोटी स्विस फ्रँक खर्च आला., यात दोन एकमार्गी बोगदे व त्यांमधील जोडबोगदे आहेत. आल्प्सच्या आरपार रेल्वेमार्ग नेणारा हा बोगदा आल्पट्रांझिटचा भाग आहे. १ जून, २०१६ रोजी या बोगद्यातून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यावर १८८१मध्ये बांधलेला गॉट्टहार्डबाह्न या अवघड मार्गाची गरज उरली नाही.
*चॅनल टनेल*
चॅनल टनेल किंवा खाडी भुयार (इंग्लिश: Channel Tunnel; फ्रेंच: Le tunnel sous la Manche) हे इंग्लंडच्या केंट काउंटीला फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशासोबत जोडणारे इंग्लिश खाडीच्या खाली बांधलेले ५०.५ किमी लांबीचे रेल्वे भुयार आहे. ह्या भुयाराच्या एकुण लांबीपैकी ३७.९ किमी अंतर पाण्याखाली आहे. १९९४ साली बांधून पूर्ण झालेल्या ह्या भुयारामुळे लंडन व पॅरिस ही युरोपामधील दोन सर्वात मोठी शहरे द्रुतगती रेल्वेने जोडली गेली आहेत. युरोस्टार ही वाहतूक कंपनी लंडन ते पॅरिस व ब्रसेल्स दरम्यान जलद प्रवासी वाहतूक सेवा पुरवते.
*सैकान बोगदा*
सैकान बोगदा किंवा सैकान भुयार (जपानी: 青函トンネル) हे जपान देशाच्या होन्शू व होक्काइदो ह्या दोन बेटांना जोडणारे एक समुद्राखालील रेल्वे भुयार आहे. ५३.८५ किमी लांबीच्या ह्या भुयाराचा २३.३ किमी लांबीचा पट्टा सुगारू सामुद्रधुनीखालून जातो.
Comments
Post a Comment