महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

*महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती*

·         3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते. 

·         महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात. 

·         महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो. 

·         महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो. 

·         महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना 'नगरसेवक' म्हणतात. 

·         महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात. 

·         महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो. 

·         आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो. 

·         महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते. 

·         महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो. 

·         महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो. 

·         सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत. 

·         पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.

Comments