भारताची एक अब्ज जनता ही जगामध्ये दहशतवादाने सर्वाधिक ग्रासलेली जनता आहे. भरित भर म्हणून ईशान्येकडील सात राज्ये कायम हिंसाचार ग्रस्त, तर 15 राज्यातील 215 जिल्हे नक्षलवादाने ग्रस्त आहेत. जनतेला किमान आवश्यक संरक्षण देण्यासाठी पोलिस कमी पडत असताना देखील देशभरातील सुमारे 47,000 पोलिस हे 13000 महत्त्वाच्या व्यक्तींना अहोरात्र सुरक्षा पुरवण्यासाठी गुंतलेले असतात. आणि यावर खर्च होतो वर्षाला 6 अब्ज रुपये! 430 व्हीव्हीआयपींना संरक्षण कवच देण्यासाठी"स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप' आणि "एनएसजी' कमांडोज अहोरात्र डोळ्यात तेल घालून जपत असतात. त्याची किंमत देशाला 300 कोटी रुपये! मोजावी लागतात .
सुरक्षा वर्गीकरण झेड प्लस दर्जा :
देशातील ही सर्वोच्च मानली जाणारी सुरक्षा पंतप्रधान, माजी पंतप्रधान यांना राखीव असते. पुढे धावणारी पायलट कार, त्यामागे बुलेटप्रुफ कार, भेटायला येणाऱ्यांची कडक तपासणी, 30 वाहनांचा ताफा, निवासस्थानी चोवीस तास, सुरक्षा रक्षक असा लवाजमा यामध्ये असतो. आणि तीन बंदुकधारी संपूर्ण 24 तास आगेमागे असतातच.झेड दर्जा सुरक्षा दोन व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी कायम व्हीआयपी बरोबर फिरत असतात. दोन गार्डस आणि एका अधिकाऱ्यासह एस्कॉर्ट व्हॅन सोबत असते.हे पथक विमानतळ, निवासस्थान किंवा कुठल्याही जागी व्हीआयपी महोदयांनी भेट देण्यासाठी त्या ठिकाणची पाहणी करते.
वाय दर्जा सुरक्षाही सुरक्षा व्यवस्था दोन प्रकारची असते. एका प्रकारानुसार राज्यांना भेटी देणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना एक एस्कॉर्ट निवासी रक्षक आणि एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी पुरवला जातो. दुसऱ्या प्रकारामध्ये फक्त वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि निवासी रक्षक असतात. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश या प्रकारांध्ये मोडतात.
एक्स दर्जा सुरक्षा 24 तासांच्या सुरक्षेसाठी तीन अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांचीही नेमणुक असते. एक विचित्र बाब अशी की अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या"रक्षणासाठी एसपीजी किंवा एनएसजी कमांडोज मागतात. त्या त्या - राज्यांचे पोलिस साक्षात मुख्यमंत्र्यांचे देखील रक्षण करण्यासाठी योग्य नाहीत का ? आणि मग ते सामान्य जनतेचे रक्षण काय करणार? असाच संदेश जनतेमध्ये जात असतो, याची जाणीव बहुधा अशा मुख्यमंत्र्यांना नसावी. सत्य असे आहे की असे रक्षण म्हणजे त्यांना आपले राजकीय महत्त्व उगाच वाढवण्याचा मार्ग वाटतो. त्यामध्ये त्यांना मोठी प्रतिष्ठा वाटते. अनेक मुख्यमंत्री सुरक्षेच्या नावाखाली 25- 30 वाहनांचा ताफा घेऊन फिरत असतात. आणि संधी मिळेल तेव्हा अशा सुविधा स्वत:साठीही वापरणारे नोकरशहा देखील यात मागे नाहीत. जेवढा मोठा "बाबू' तेवढी त्याच्या निवासस्थानच्या सुरक्षा रक्षकांची संख्याअधिक असते.
Comments
Post a Comment