मुंबईत पाहण्या सारखी ठिकाणे
गेट वे ओफ इंडिया
मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे.
भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. जॉर्ज विटटे यांच्या कल्पनेतून साकार झालेली वास्तू असून वास्तूचे बांधकाम पिवळ्या बसातर दगडात केले आहे.वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. या वास्तूचे बांधकाम आणि त्यावरील सुंदर गुजराती शिल्पकला वाख्ण्याजोगी आहे. अशी भव्य-दिव्य वास्तू पहिल्या नंतर येथून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या. गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात. या फेरी बोटांचा प्रवास सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असून या बोटीतून प्रवास करण्यासाठी ८० ते १२० रुपये पर्यंत तिकीट आकारले जाते.
त्याचबरोबर येथील देशी-परदेशी लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यागाड्या आणि टांगे. प्राचीन मुंबईत आलेल्या प्रत्येक पर्यटकाची पहिली पसंती असलेल्या या वास्तूसमोर छायाचित्र काढण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. गेट वे ऑफ इंडिया व भव्य विशाल अशा ताज होटेल समोर वेगवेगळ्या पोझमध्ये उभे राहून पर्यटकांचे फोटो काढण्यास अनेक छायाचित्रकार असतात. निव्वळ २० ते ५० रुपये आकारून हे फोटो काढून दिले जातात.
नरिमन पॉइण्ट
समुद्राच्या भागाचे पुनर्वसन करून हा भाग वसवण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे येथे वापरण्यात आलेले सिमेंट आणि स्टील हे काळ्या बाजारातून आणण्यात आले होते.
नरिमन पॉइण्ट जास्त उजेडात आले ते २००७ साली या भागातील एक रहिवासी जागा (flat) ८.६२ लाख अमेरिकन डोलर्स म्हणजे (९७,८४२ रु.) प्रती चौरस फूट या दराने विकला गेल्यावर ! येथे अनेक विदेशी कंपन्या ची मुख्यालये आहेत.
महाराष्ट्राचे राजकीय मुख्यालय म्हणून ओळखले जाणारे विधान भवन देखील देखील येथेच आहे. येथून “कफ परेड” आणि “ब्याक्बे रेक्लमेशन” हि मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे दिसतात.
महालक्ष्मी मंदिर
महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. इ स 1831 ला धाक जी दादाजी नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिर पूर्ननिर्माण केले. या मंदिरामागे बराच मोठा इतिहास आहे तो म्हणजे 1785 साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते. त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर पाठारे प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी त्या मुर्तीचा शोध घेतल्यास त्यांना तिथे लक्ष्मीची मूर्ती सापडली.
त्यानंतर त्यांनी तेथेच तिचे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. हाजी अली दर्गावरुन महालक्ष्मी मंदिर दृष्टीस पडते. हे मंदिर समुद्रा जवळ असल्याने अजून नयनरंम्य वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात देवी महालक्ष्मी, देवी महाकाली व देवी महासरस्वती यांच्या मूर्त्या आहेत.
या तीनही देवींच्या मुर्त्या स्वयंभू असून त्यांना सोन्याच्या आवरणाने झाकलेले असते. त्यांचे विनाआवरण दर्शन घ्यायचे असल्यास रात्री मंदिर बंद करताना जावे लागते.
हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भक्तांसाठी खुले असते. तर नवरात्रीमध्ये सकाळी 6 वाजता देवीची आरती झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होते ते रात्री 12 पर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. मंदिराला लागूनच हार, फुले, प्रसाद व मिठाईची दुकाने आहेत. नवरात्री मध्ये या मंदिराला फुलांनी सजवले जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी खुप मोठी गर्दी उसळते. तसेच येथे जत्रा ही भरते. महालक्ष्मी स्टेशनवरुन शेअर टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच बसेस ही आहेत. शेअर टॅक्सी- एका माणसे किमान भाडे 10 रुपये. महालक्ष्मी स्टेशनवरुन पायी 15 ते 20 मिनिटात महालक्ष्मी मंदिरात जाता येते.
हाजी अली
सिनेतारकापासून ते सर्वसामान्यपर्यंत सर्वांनाच भक्तीभावाने नतमस्तक करायला लावणारे हे ठिकाण म्हणजे मुंबईतील हाजी अली दर्गा. १४३१ साली बांधण्यात आलेली १०० वर्ष जुनी असलेली हि दर्गा हाजी अली या सुफी संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हि वास्तू बांधण्यात आली आहे.
दुरून हि दर्गा पाहिल्यास अथांग सागरात एक मोती तरंगण्याचा आभास होतो. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विरुद्ध दिशेला समुद्रात एका बेटावर हि दर्गा आहे. या दर्ग्यात जाण्याचा अनुभव काही निराळाच..
या दर्ग्यापर्यंत जाण्यासठी एक पायवाट आहे हि पायवाट समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा देसेनाशी होते आणि जणू हि दर्गा समुद्रावर अधांतरी तरंगल्या सारखी भासते. दर्ग्यात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर अशा भारतीय आणि अरेबिक वास्तूशैलीचा संगम आढळतो. दर्ग्यातील कबरीभोवती चारही बाजूंनी चांदीची चौकट असून सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांचा आधार आहे.
या नक्षीकामात अरेबिक भाषेत लिहिलेली अल्लाची ९९ नावे आहे. या दर्ग्यासमोर महालक्ष्मी देवीचे मंदिरही आहे. थोडे पुढे गेलात कि घोड्याच्या शर्यतीचे मैदान म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स पाहता येतील.
या दर्ग्याचे व येथील ठिकाणे पाहून झाल्यावर हाजी अलीला जो मुख्य सिग्नल आहे तिथे उभे असलेले प्रशस्त हाजी अली ज्यूस सेंटर. थंडगार मिल्कशेक, सरबत, फालुदा या वेगवेगळ्या व्हरायटीबरोबर येथे आंबा, चिकू, सफरचंद अशा विविध फळांपासून बनवलेले क्रीम ही येथील खासियत. तर नक्कीच देवदर्शन झाल्यावर या ज्यूस सेंटरला भेट द्या. या दर्ग्याला भेट द्यायला तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या महालक्ष्मी व मुंबई सेंट्रल स्थानकावरून तर मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकावरून जाऊ शकता किवा तुम्ही बसने हि प्रवास करू शकता.
बस क्र:- ३३, ३७, ६३, ८१, ८२, ८४, ९२, ९३, १२४, १२५, ३५१, ३५७, ३८५, ५२१.
सिध्दीविनायक गणपती
मुंबईतील प्रसिध्द असणारे सिध्दीविनायक हे मंदिर सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. लक्ष्मण विठू पाटिल आणि देऊबाई पाटिल यांनी हे मंदिर इ. स. 1801 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी बांधल्याचे मुंबईतील देवालये या के. रघुनाथजी यांच्या ग्रंथात आढळतो.
नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री सिध्दीविनायकाची ओळख आहे. गणपतीची मूळ मुर्ती 2.6 इंच व 2 इंच रुंद असून एका काळ्या दगडात बनवलेली आहे. उजवी सोंड, माथ्यावर मुकुट, चार हात, दोन हातात अंकुश आणि कमळ, खालच्या दोन हातांपैकी उजव्या हाती माळ आणि डाव्या हाती मोदकाची वाटी, मूर्तीच्या गळ्यात सर्पाचे जानवे असे या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे.
उजव्या सोंडेचा हा गणपती सिध्द पीठ असल्यामुळे तो सिध्दीविनायक म्हणून ओळखला जातो. तसेच या गणपतीला लग्नी गणेश असे ही म्हटले जाते.
सकाळी 6 वाजता यथासांग पूजा व अभिषेक झाल्यावर गणपतीच्या दर्शनाला सुरुवात होते.
जवळचे स्टेशन – दादर.
दादर स्टेशन वरुन पायी 10 ते 15 जाऊ शकतो. तर शेअर टॅक्सी व बस ही उपलब्ध आहेत
छत्रपती शिवाजी टर्मिनस : (सी.एस.टी. स्टेशन)
काही वर्षांपूर्वी याचे नावं व्हिक्टोरिया टर्मिनस हे होते. एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या तीन वर्षांमध्ये मुंबईच्या वैभवात निरनिराळ्या नयनरम्य इमारतींची भर पडली. बोरीबंदर हे त्यातील सर्वोत्कृष्ट वास्तुशिल्प.ह्या इमारतीच्या कौशल्यपूर्ण आणि यथोचित अशा रचनेमुळे त्याचप्रमाणे नक्षीदार सुंदर कमानींमुळे ही इमारत एखाद्या भव्योदात्त चर्च सारखी दिसते.
मध्यभागी मोठा घुमत आणि वर निमुळते होत जाणारे मनोरे ह्यामुळे लंडनच्या वेस्ट मिनिस्टर एबे ह्या इमारतीशी तिचे साधर्म्य जोडले गेले आहे. संपूर्ण कोरीव दगडांच्या ह्या इमारतीवर प्लास्टरचे नक्षीकाम, नक्षीदार गडद रंगाच्या काचा असलेल्या इमारतीच्या खिडक्या आणि घुमट व मनोरे ह्यांवरील खिडक्या या संपूर्ण वास्तूला उठावदार बनवतात.
एस्सेल वर्ल्ड

एस्सेल वर्ल्ड हे मुंबईतले किंबहुना भारतातले सर्वात मोठे amusement park आहे. एक मोठाली जत्राच म्हणा ना.वेगवेगळ्या राईड्सचा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी येथे रोज १०००० लोक भेट देतात. हे पार्क ६४ एकर परिसरात उभारलेले आहे जे १९८६ मध्ये सुरु करण्यात आले होते.
येथे १०० पेक्षाही जास्त राईड्स आहेत. त्यापैकी ३४ राईड्स या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. याचा जास्त भर हा ड्राय राईड्स वर आहे. प्रत्येक वायोगातालील लोकांसाठी येथे राईड्स उपलब्ध आहेत.जर तुम्हाला राईड्सची भीती वाटत असेल तर डान्स फ्लोर, आइस स्केटिंग, बोलिंग एले, तुमचा मन नक्कीच आकर्षित करून घेईल.येथे येताना संपूर्ण दिवस राखून यावे. कारण १०० राईड्सचा आनंद घेताना दिवस कसा निघून जातो कळतही नाही.
पण बालपण मात्र नक्की परत येते..





Comments
Post a Comment